" "शिक्षणवेध 2" या माझ्या ब्लॉगला भेट देणार्या सर्वांचे मी श्री.राहुल गंगाधर वाघमारे आपले मनापासून सहर्ष स्वागत करीत आहे
html codesJavascript Codes
" या ब्लॉगवरची बरीचशी माहिती ही संकलित केलेली असल्यामुळे ब्लॉगवरील सर्व बाबींशी[ माहितीशी ] ब्लॉगर सहमत असेलच असे नाही.तसेच या ब्लॉग मध्ये जोडलेल्या लिंक्समध्ये बदल झाल्यास अथवा लिंक हॅक झाल्यास ब्लॉगर जबाबदार राहणार नाही.यांची प्रामुख्याने नोंद घ्यावी..
html codesJavascript Codes
" माझ्या शिक्षणवेध 2 ब्लॉगवर आपले सहर्ष स्वागत आहे. Wel come to my shikshanvedh 2 Blog.
html codesJavascript Codes

सुविचार


         सुविचार
          ============ 
जि.प.प्राथमिक शाळा अंधारमळा केंद्र गल्लेबोरगाव
      ता. खुलताबाद जि. औरंगाबाद.

*दैनिक टाचणावर लिहीण्यासाठी 300 अनमोल सुविचार*

सुरुवात कशी झाली यावर बऱ्याच घटनांचा शेवट अवलंबून असतो.
आयुष्यात भावनेपेक्षा कर्तव्य मोठे असते.
प्रार्थना म्हणजे मनाचं स्थान
जग प्रेमाने जिंकता येतंशत्रुत्वाने नाही.
यश मिळवायचं असेल तर स्वत: स्वत:वर काही बंधन घाला.
प्रत्येकाच्या मनात एक आदर्श व्यक्ती असलीच पाहिजे.
ज्याने स्वत:चं मन जिंकलं त्याने जग जिंकलं.
यश मिळवण्यासाठी सगळ्यात मोठी शक्ती-आत्मविश्वास.
प्रतिकूलतेतही अनुकूलता निर्माण करतो तोच खरा माणूस !
१०चुकतो तो माणूस आणि चुका सुधारतो तो देवमाणूस !
११मित्र परिसासारखे असावेत म्हणजे आयुष्याचं सोनं होतं.
१२छंद आपल्याला आयुष्यावर प्रेम करायला शिकवतात.
१३आपण जे पेरतो तेच उगवतं.
१४फ़ळाची अपेक्षा करुन सत्कर्म कधीच करु नये.
१५उशीरा दिलेला न्याय हा  दिलेल्या न्यायासारखा असतो.
१६शरीराला आकार देणारा कुंभार म्हणजे व्यायाम.
१७प्रेम सर्वांवर करा पण श्रध्दा फ़क्त परमेश्वरावरच ठेवा.
१८आधी विचार करामग कृती करा.
१९आयुष्यत आई आणि वडील यांना कधीच विसरु नका,
२०फ़क्त स्वत:साठी जगलास तर मेलास आणि स्वत:साठी जगून दुसऱ्यांसाठी जगलास तर जगलास !
२१एकमेकांची प्रगती साधते ती खरी मैत्री.
२२अतिथी देवो भव 
२३अपयशाने खचू नकाअधिक जिद्दी व्हा.
२४दु: कवटाळत बसू नकाते विसरा आणि सदैव हसत रहा.
२५आपल्यामुळे दुसऱ्याला दु: होईल असे कधीही वागू नका.
२६निघून गेलेला क्षण कधीच परत आणता येत नाही.
२७खऱ्या विद्यार्थ्याला कधीच सुट्टी नसतेसुट्टी ही त्याच्यासाठी नवं काहीतरी शिकण्याची संधी असते.
२८उद्याचं काम आज करा आणि आजचं काम आत्ताच करा.
२९चुकीचा व्यवहार माणसं तोडतो म्हणून तो सत्याने आणि सन्मानाने करा.
३०नवं काहीतरी शिकण्यासाठी मिळालेला वेळ म्हणजे सुट्टी.
३१माणसाची चौथी मूलभूत गरज म्हण्जे पुस्तक.
३२सत्याने मिळतं तेच टिकतं.
३३जो दुसऱ्यांना देतो त्याला देव देतो.
३४परमेश्वराच्या आशीर्वादाशिवाय कुठलेही कार्य सिध्दीस जात नाही.
३५हिंसा हे जगातलं सगळ्यात मोठं पाप आहेमग ती एखाद्या माणसाची असो वा पशुची !
३६स्वप्न आणि सत्य यात साक्षात परमेश्वर उभा असतो.
३७प्राप्तीपेक्षा प्रयत्नांचा आनंद अधिक असतो.
३८खरी श्रीमंती शरीराचीबुध्दीची आणि मनाची
३९तडजोड हे आयुष्याचं दुसरं नाव आहे.
४०वाहतो तो झरा आणि थांबते ते डबकं ! डबक्यावर डास येतात आणि झऱ्यावर राजहंस !!
४१जो गुरुला वंदन करत नाहीत्याला आभाळाची उंची लाभत नाही.
४२गर्वाचं घर नेहमीच खाली असतं.
४३झाडावर प्रेम करणारा माणूस सदैव प्रसन्नच असतो.
४४माणसाचा सगळ्यात मोठा सदगुण म्हणजे त्याची माणुसकी
४५क्रांती हळूहळू घडतेएका क्षणात नाही.
४६सहल म्हणजे माणसिक आनंदाची सामुहिक क्रिडा
४७मुक्या प्राण्यांवर सदैव प्रेम करा.
४८आयुष्याच्या प्रवासात प्रवास अत्यावश्यक आहे.
४९बाह्यसौंदर्यापेक्षा अंतर्गत सौंदर्य जास्त मोलाचं असतं.
५०मनाची श्रीमंती ही कुठल्याही श्रीमंतीपेक्षा मोठी असते


                                                        ** संकलन **

                                                  श्री. वाघमारे राहुल गंगाधर 
                                                       [प्रा.शि.] 
                                                      प्रा.शा.अंधारमळा 

No comments:

Post a Comment